वारकरी संतांचा भक्तियोग


सारांश: भारताची भूमी ही निर्मळ भावनेची आणि श्रद्धेची आहे. निर्मळ भाव आणि अभंग निष्ठा यांच्या समन्वयातून भारताच्या भूमीत अनेक सात्त्विक प्रवाह निर्माण झाले. या सात्त्विक प्रवाहांनी, भक्तिपंथांनी भारताचे सांस्कृतिक जीवन समृद्ध केले. नाथ, दत्त, शैव, वैष्णव, वारकरी, रामदासी, पाञ्चरात्र, रामावत, वीरशैव, वल्लभ इत्यादी अनेक संप्रदायांनी भक्तीची, सदाचाराची, सहिष्णुतेची एक प्रचंड लाट या भूमीत निर्माण केली. त्या लाटेचे महासागरात रूपांतर झाले. भारतात आज पन्नास-पाऊणशे संप्रदाय असे आहेत की ज्यांना कोट्यवधी अनुयायी तर आहेतच, परंतु समाजाचे सत्त्व रहावे म्हणून हे सर्व संप्रदाय समाजात सद्गुणांच्या रोपणासाठी नित्य कार्यरत आहेत. भारताच्या सांस्कृतिक परंपरेत ज्यांचे महान योगदान झाले आहे त्यात महाराष्ट्रातील पंथांची कामगिरी पारमार्थिक दृष्ट्या फारच विलक्षण आणि ऐतिहासिकदृष्ट्या श्रेष्ठ आहे. महाराष्ट्रातील सर्व संप्रदायांमध्ये वारकरी संप्रदाय हा संख्येने निःसंशय मोठा आणि अत्यंत लोकप्रिय असा संप्रदाय आहे.

लेखक: शंकर अभ्यंकर 

संदर्भ क्रमांक: १०२७

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र