सार्थ सर्व देवपूजा
सारांश: हिंदु धर्मातील सगुण उपासनापद्धतीचा पाया म्हणजे ‘देवपूजा’! नित्याच्या धावपळीच्या दिनक्रमात देवपूजेसाठी एवढा वेळ आहे कोणाला?, अशी नकारात्मक मानसिकता हल्ली बर्याच जणांमध्ये आढळते. केवळ एक नित्यकर्म पार पाडायचे म्हणून देवावर भरभर पाणी घालायचे, गंधाचा टिळा लावायचा आणि फूल वाहून उदबत्तीने ओवाळायचे अन् ‘देवपूजा झाली’, अशी स्वतःची समजूत करून घ्यायची, असे चित्र आज दिसून येते. सगुण उपासना म्हणजे नक्की काय हे लक्षात घेऊन नित्य देवपूजा केल्याने मन:शांति लाभते. घरात पवित्र आणि प्रसन्न वातावरण राहतं.
संदर्भ क्रमांक: १०१२
