रानफुलांचा झुला


सारांश: अग्निशिखा किंवा गौरीचे हात म्हणून ओळखले जाणारे फूल चक्क रंग बदलत उमलते, बांबूला ४० वर्षांनी फुले येतात आणि बांबूचे फुलणे ही त्याच्या मृत्यूची नांदी असते, कारवीची फुले ज्या वेळी ७ वर्षांनी एकाच वेळी फुलतात तेव्हा आभाळाची निळाई डोंगरावर अवतरते आणि सारा डोंगरच निळा होऊन जातो, पांगाऱ्याचं लाकूड पाण्यातही वर्षानुवर्षं टिकतं तर फूल औषधी असतं, सुरंगीची फुलं चक्क खोडाला येतात... अशा अनेक गोष्टी आजच्या किशोरवयीन मुलांना ठाऊकच नसतात. त्या ज्यांवेळी समजतात, तेंव्हाच त्यांना त्या झाडांविषयी प्रेम वाटू लागतं. आजच्या किशोरवयीन मुला-मुलींना अवतीभवतीच्या फुलझाडांविषयी प्रेम निर्माण व्हावं, माणसाचं अन् झाडाचं नेमकं नातं काय याचा बोध व्हावा, आजच्या विद्यार्थिवर्गाला झाडांचे नेमके उपयोग माहिती व्हावेत यासाठीच हा प्रयत्न!

लेखक: प्रा. सुहास बारटक्के

संदर्भ क्रमांक: ४०४३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र