अनोखे सस्तन प्राणी


सारांश: सस्तन प्राणी हे प्राणिसृष्टीतील प्रगत आणि विकसित प्राणी म्हणून ओळखले जातात. परंतु त्यांचे अनोखे विश्व पाहिले म्हणजे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण जीवन, परिस्थितीशी केलेले समायोजन, शत्रूला हुलकावणी देण्याची पद्धत इ. गोष्टी विस्मयकारक वाटतात. ध्रुवीय अस्वल बर्फाळ प्रदेशात राहते, तर मिरकॅट, आर्डलांडगा बिळात राहतात. आफ्रिकन शिकारी कुत्रे समूहाने मोठ्या प्राण्याची सहज शिकार करतात. नासके-कुजके खाद्य खाऊन तरस जंगलाचे आरोग्य राखतो. वालरस, समुद्रसिंह, पाणघोडा यांसारखे सस्तन प्राणी जलचर जीवन जगतात. हरणांचे जग अजब आहे. वायुवेगाने धावणारे काळवीट, चारशिंगाचा चौशिंगा आणि कस्तुरी मृग अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहेत. उंट हा रखरखीत वाळवंटाचा सम्राट म्हणून ओळखला जातो. डोंगराळ प्रदेशात कड्याकपारीच्या जागी रानबोकड, बार्बरी मेंढी, डोंगरी मेंढी सुखासमाधानाने राहतात. या प्राण्यांच्या दुनियेत भूतलावरचा सर्वांत उंच प्राणी जसा जिराफ आहे, तसा गवा हा दणकट व शक्तिशाली प्राणीही आहे. यांसारख्या अनेक प्राण्यांच्या लकबी, सवयी आणि जीवन-संघर्ष याची मनोरंजक माहिती वाचकांना नक्कीच आवडेल!

लेखक: नलिनी पवार, डॉ. किशोर पवार

संदर्भ क्रमांक: ४०२७ 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र