ऋषी बंकिमचंद्र
सारांश: भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महामंत्र वंदे मातरम्. या राष्ट्रीय गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी तथा चट्टोपाध्याय यांचे चरित्र आहे - ऋषी बंकिमचंद्र. त्यांच्यावर मराठीत प्रकाशित झालेले हे पहिलेच चरित्र. ज्यांना भाराताच्या आधुनिक राष्ट्रवादाचे जनक मानले जाते, त्या महापुरुषावर त्यांच्या निर्वाणानंतर १२८ वर्षात एकही चरित्र लिहिले गेले नाही, ही शोकांतिकाच. तब्बल २५ वर्षे वंदे मातरम् या विषयावर अभ्यास व संशोधन करणाऱ्या मिलिंद सबनीस लेखकाने हे चरित्र लिहिले आहे. त्यामुळे या चरित्राला संदर्भ ग्रंथ म्हणून मूल्य प्राप्त झाले आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना हे चरित्र प्रकाशित होणे हा अमृतयोग आहे. वंदे मातरम् हे भारताचे राष्ट्रीय गीत आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात वंदे मातरम् हे दोन शब्द प्रेरक मंत्र बनले. वंगभंग आंदोलनात वंदे मातरम् या शब्दावलीला महामंत्राचे स्वरूप प्राप्त झाले. ६ वर्षे आंदोलन चालले. जिहादी शक्तीच्या दबावात येत ब्रिटिशांनी केलेली बंगालची रद्दबातल करावी लागली. म्हणजेच वंदे मातरम् या महामंत्राला आम्ही जवळ केलं तेव्हा या देशाची - बंगालची फाळणी रद्द झाली. परंतु, वंदे मातरम् अंगीकारण्यात आम्ही संकोच केला तेव्हा या देशाचे तुकडे पडले. आमच्याच भूमीवर पाकिस्तान, बांगलादेश उगवले. या देशाची एकता दृढ करण्याचे सामर्थ्य वंदे मातरम् या भावनेत आहे. मातृभूमी प्रेमाचा शाश्वत आविष्कार साकारणाऱ्या बंकिमचंद्र यांची जीवनकार्य ऋषीतुल्य आहे. बाल व युवा पिढीला प्रेरक आहे.
लेखक: मिलिंद प्रभाकर सबनीस
संदर्भ क्रमांक: २०३४
