संत ज्ञानेश्वरांचा भक्तीयोग


सारांश: संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर म्हणजे महाराष्ट्र संस्कृतीचा आत्मा! परमार्थाच्या क्षेत्रात आदि शंकराचार्यांचा अपवाद वगळता इतके अद्भुत आणि अलौकिक दुसरे चरित्र नाही. मुक्ताबाईंनी वर्णन केल्याप्रमाणे ज्ञानेश्वर सर्वार्थाने 'मोठा वैष्णव' आहेत. ज्ञानेश्वरांची ज्ञानोत्तर भक्ती, अव्दैताचे निरूपण, भाषाप्रभुत्त्व, स्वधर्म हाच आत्मा असलेला कर्मयोग, समन्वयात्मक नीतिबोध, करुणेने तुडुंब भरलेली मानवतावादी दृष्टी, रससिद्धता, अनुभवसिद्ध राजयोग आणि त्यांचा चिद्विलासवाद सगळे काही लोकोत्तर आहे. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथातील विचारवैभवाची खोली मती गुंग करून टाकणारी आहे. 'ज्ञानेश्वरी' वा 'भावार्थदीपिका' हा त्यांचा गीताभाष्याचा ग्रंथ म्हणजे अद्वैत तत्त्वज्ञानाचा महन्मंगल आणि परमपवित्र असा कलश होय. त्यांच्या काव्यातील रसकल्लोळ, अवघे विश्वच वैकुंठ करणारी भक्ती आणि प्रत्येक पदातून आपल्या अनुभवास येणारी ज्ञानेश्वरांची उदारता व विशालता, सगळेच लोकविलक्षण आहे. चमत्कार हा शब्द सुद्धा थिटा वाटावा, इतके अलौकिक असे ज्ञानेश्वरांचे चरित्र आहे.

लेखक: शंकर अभ्यंकर 

संदर्भ क्रमांक: १०३० 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र