किल्ले विशाळगड दर्शन
सारांश: किल्ले विशाळगड उर्फ खेळणा म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्णपान होय. पावनखिंडीच्या रणसंग्रामात अत्यंत निकडीच्या वेळी शिवरायांना आसरा देणारा हा गड औरंगजेबच्या वेढ्यावेळी असा काही लढला की त्या भीषण अनुभवाने मोगल इतिहासकार साकी मुस्तेदखान लिहून गेला,- "खेळणा किल्ला म्हणजे मूर्तिमंत, कष्ट आणि संकटे तो घेण्याची कल्पना जरी केली तरी प्राण कंठाशी येतात." अशा या रोमहर्षक गडाचा इतिहास व स्थळदर्शन यांचे वर्णन दुर्गअभ्यासक भगवान चिले यांनी प्रस्तुत पुस्तकात केले आहे. हे पुस्तक वाचून दुर्गप्रेमींनी विशाळगडाला भेट दिल्यास त्यांना इतिहासाचे एक परिपूर्ण भांडार 'याचि देही याची डोळा' अनुभवल्याचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक: भगवान चिले
संदर्भ क्रमांक: २०३३
