सार्थ श्रीगरुड पुराण


सारांश: गरुडपुराण हे अठरा पुराणांतील एक आहे. त्यामध्ये सृष्टीच्या विविध अंगांचे व नियमांचे ज्ञान विस्ताराने वर्णिलेले आहे. विविध स्तोत्रे, वेगवेगळ्या देवांच्या उपासना, मंत्रतंत्र, ज्योतिषविज्ञान, स्वरोदय, रत्नपरीक्षा, चार पुरुषार्थ, गुरुकथित नीतिशास्त्र, निरनिराळी व्रते, रोग, त्यांच्या परीक्षा व उपचार, असे विविध विषय पहिल्या कांडात आले आहेत. दुसऱ्या कांडाचे नाव 'प्रेतकल्प' असे आहे. त्यामध्ये मुख्य विषय आहे तो म्हणजे 'मृत्यूनंतर काय?' त्याचे विवरण करताना, मृत्यू कसा होतो? प्राण कसा बाहेर पडतो? नरक कसे आहेत आणि ते कुणाला प्राप्त होतात? उत्तरक्रियेचे विधी, दानाची फळे, प्रायश्चिते, पुनर्जन्म अशा अनेक गोष्टींबद्दल स्पष्टीकरण केलेले आहे. तिसरा भाग 'ब्रह्मकांड' नावाचा आहे. अशी पद्धती समाजात रूढ आहे की, कुणा एखाद्याच्या मृत्यूनंतरच्या दहा दिवसांत गरुडपुराणाचे विधिपूर्वक वाचन करावे अथवा ब्राह्मणाकडून करवून घ्यावे. अन्यथा याचे वाचन करू नये. हा लौकिक अर्थाने रूढ झालेला समज आहे. तसा उल्लेख शास्त्रांमध्ये मिळत नाही. त्यामुळे अभ्यास व माहिती मिळावी म्हणून जर कुणाला हा ग्रंथ अवलोकन करावा अशी इच्छा झाली तर केवळ प्राकृत अर्थावरून तसे करायला हरकत नसावी. त्यामुळे पाप-पुण्य, स्वर्गप्राप्ती व नरकप्राप्ती का होते? मृत्यूनंतर दुर्गती प्राप्त होऊ नये याकरिता जिवंत आहोत तोवर कोणती तरतूद करता येईल त्याची कल्पना येईल. कारण कर्म करण्याचे स्वातंत्र्य फक्त मनुष्यालाच आहे. एकदा का हा देह सुटला की अगतिक होऊन कृतकर्माची फळे भोगत बसणे एवढेच हातात उरते. त्यामुळे सद्गती मिळण्यासाठी जिवंतपणीच काय करता येईल ते समजण्यासाठी हे गरुडपुराण फार मोलाचे आहे.

लेखक: रामानंद ठाकूर 

संदर्भ क्रमांक: ११०१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र