रामदासी गणेशविद्या


सारांश: 'सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची। नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची... संकटीं पावावें निर्वाणीं रक्षावें सुरवरवंदना॥...' चारशे वर्षांपूर्वी समर्थ रामदासांनी रचलेल्या वरील आरतीतील 'गणेशप्रेम' आजही लाखो कंठांतून तितकेच अविरत प्रवाहित असल्याचे जाणवते... 'संकटी पावावे...' या उल्लेखानुसार, जेव्हा आपल्या आयुष्यात एखादा संकटाचा, आपत्तीचा काळ येऊन ठेपतो, तेव्हा मात्र समर्थांनी त्यांच्या तत्त्वज्ञानातून त्या 'विघ्नहर्त्या परमेश्वराचा शोध' स्वत:च्या क्षमता, बुद्धी व आत्मशक्तीमध्ये घ्यावा असा उपदेश केला होता. नेहमीच्या मूर्ती / अन्य प्रतीके ही आपल्या मनाला केवळ परमेश्वराठायी स्थिर करण्यासाठी असतात, परंतु ज्यावेळी आपण एखादे उद्दिष्ट ध्येय ठरवून त्या दिशेने येणाऱ्या संकटांशी सातत्याने संघर्ष करतो, त्या वेळी समर्थ ' हा विघ्नहर्ता' स्वत:च्या अंतरात्म्यात पहावा, असे सांगतात. त्या अंतरात्म्यातील 'गणेश-वर्णन' समर्थांनी त्यांच्या एका दखनी पदात मांडले- आत्मरूप गणेश रंग मनाचे । मनोकामना कवल हात मों लिये। गडगड कंठ बोधे बजावत । एकही दंत झलकत हय । शांती फडकावत कर्णथाप । एक देश मों ना सभी ज्यगह मों नाचे । ऐसो रंग मों नाचे आत्म गणपती । रामी रामदास बस नाम मों पायें पूरन गती । या पदात सांगितल्याप्रमाणे 'आत्मबळ' आत्मरूप गणपतीला त्याच्या 'नावाला मनात स्मरत' प्रत्यक्ष कामात सर्व बळ लावले पाहिजे. थोडक्यात 'गणेश' या बुद्धिसंज्ञेला समर्थांनी नेहमीच 'ज्ञानमार्गाने' शोधल्याने रामदासी उपासनेच्या नित्यक्रमातही त्यांनी "लेखन-वाचन- अर्थांतर-ग्रंथाध्ययन प्रचिती' अशा विविध ज्ञानोपासक रचना केल्या होत्या.

लेखक: मनीषा बाठे 

संदर्भ क्रमांक: १००४ 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र