श्री वामन पुराण
सारांश: अठरा पुराणांत भारतीय संस्कृती आणि धर्मतत्त्वांचे सामान्य जनांसाठी विद्वान महर्षींनी संकलन केले आहे. नीती, सदाचार आणि सच्चरित्र यांचे शिक्षण देणारे आसेतु-हिमालय शिक्षक म्हणजे ही पुराणे होत.
पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतम्।
उत्तमं सर्वलोकानां सर्व ज्ञानोपपादक्॥
म्हणजे ब्रह्मदेवाने समस्त शास्त्रांच्या प्रथम पुराणे अवलोकिली, कारण जगात सर्वश्रेष्ठ ज्ञान देणारी पुराणे हीच होत. ही पुराणे मुळात ब्रह्मदेवाने निर्माण केली असे म्हणतात आणि व्यासांनी त्यांना ग्रंथरूप दिले. वामनपुराणांत वामन व बळीराजाची कथा प्रमुखपणे वर्णन केलेली आहे. या कथेच्या वर्णनप्रसंग-निमित्ताने काही सामाजिक आशयांचा सांस्कृतिक भागही आला आहे. मूळ वामनपुराणातील आशय व विषय कायम ठेवून त्याला योग्य असे वर्तमानकालीन स्वरूप दिले आहे.
संपादक: दत्ता कुलकर्णी
संदर्भ क्रमांक: ११००
