वेदान्त आणि जीवन
सारांश: "आचरणात आणणे अगदी असंभवच असेल तर कोणत्याही तत्त्वाला एक बौद्धिक कसरत यापरीस आणखी काहीच मूल्य नाही. वेदान्त हा धर्म आहे. आणि त्या दृष्टीने तो सर्वतोपरी आचरणात आणण्याजोगा असावयासच हवा. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात तो आचरता येणे आपल्याला शक्य झाले पाहिजे. ... निबिड अरण्यात व गिरिकंदरात जन्मलेली ही गहन तत्त्वे गजबजत्या नगरनगरींच्या कोलाहलमय जीवनात कशी मूर्त स्वरूपास आणली गेली हे आपण समजून घ्यावयास हवे.’’ — लंडन येथे १० नोव्हेंबर १८९६ रोजी ‘वेदान्त आणि जीवन’ (Practical Vedant) या विषयावर व्याख्यान देताना स्वामी विवेकानंदांनी असे उद्गार काढले होते. वेदान्तातील चिरंतन आदर्श प्रत्यक्ष जीवनात कसे आणता येतील याचे स्वामीजींनी लंडन येथे चार व्याख्याने देऊन अत्यंत स्फूर्तिदायी व सुबोध विवरण केले आहे. ती व्याख्याने अत्यंत लोकप्रिय झाली होती.
लेखक: स्वामी विवेकानंद
संदर्भ क्रमांक: १०६८