मधुमक्षिका पालन


सारांश: मधासाठी मधमाश्यापालन हा आपल्याकडील मधमाश्या संगोपनाचा प्रमुख उद्देश असून महाराष्ट्रातील विशेषतः पश्चिम घाट व कोकण यामध्ये आज जवळ-जवळ दोन हजार कुटुंबे जोडधंधा म्हणून हा ग्रामोद्योग करीत असून अंदाजे अठरा लाख रूपये किंमतीचा सुमारे सत्तर टन मध आज महाराष्ट्रात तयार होतो. या उत्पादनात अधिक प्रमाणात वाढ होण्यास वाव आहे. मधमाश्या नैसर्गिकरीत्या जंगलातून पोळे बनवतात, अनेक झाडांचे परागीकरण करून निसर्गचक्रास मदत करतात; त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखण्यास मदत होते, मधमाश्या हा पिकांच्या परागीभवनासाठी वापरल्या जातात. त्यामुळे पिकांच्या व फळाच्या उत्पादनात अनेक पटींनी वाढ होते. शेतातील अनेक पिके व फळझाडे फक्त मधमाश्यांवरच परागीभवन व फळधारणेसाठी अवलंबून असतात. मधमाशी फुलातील मकरंद गोळा करते. त्या वेळी तिच्या केसाळ अंगावर, पायांवर फुलातील असंख्य पराग चिकटतात. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना त्या पर परागीकरण खात्रीपूर्वक व सहज गतीने घडवून आणतात. त्यामुळे पिकांच्या, फळझाडांच्या उत्पन्नात भरगोस वाढ मिळवून देतात. मात्र बऱ्याचशा शेतकऱ्यांना या बाबींची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे मधमाश्यापालन या बाबीकडे बऱ्याच वेळा शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते.

लेखक: डॉ. तानाजीराव चोरगे

संदर्भ क्रमांक: ४०५०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र