चाणक्य चरित्र
सारांश: आर्य चाणक्य या नावाने प्रख्यात असणाऱ्या या पुरुषाचे मूळ नाव विष्णुगुप्त. बिहारमधील गंगेच्या काठचे चणक गाव. विष्णुगुप्ताचे पिता कपिलदेव यांचा हा एकुलता एक मुलगा. त्यांचे गोत्र नाम कुटल. त्यावरूनच कौटिल्य हे नाव पडले. ग्रामनामावरूनच चाणक्य हे नाव तयार झाले. पाळण्यातले नाव विष्णुगुप्त होतेच. विष्णुगुप्त चाणक्य कौटिल्य ही तीनही नावे निरनिराळ्या प्रकारे तयार झालेली, पण एकाच पुरुषाची होती. या तीन नावांवरून हे तिघेजण निरनिराळे आहेत काय असा वाद पुढच्या काळात निर्माण झाला. पण ह्या तिन्ही नावाने ओळखला जाणारा हा महापुरुष एकच होता. इतिहासाला चाणक्याचा तपशील अधिकृतपणे ज्ञात नाही. परंतु ज्या वेळी इतिहास ज्ञात नसतो त्या वेळी लोककथा, आख्यायिका, काव्य यांच्या आधारानेच इतिहासाची कशी जुळणी करायची, याचा धडा ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी आपल्या 'प्राचीन महाराष्ट्र' या ग्रंथात घालून दिलेलाच आहे. त्यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसारच चाणक्याचे हे सत्याशी खूपच जवळ जाणारे चरित्र रचण्याचा येथे प्रयत्न केला आहे.
लेखक: ह. अ. भावे
संदर्भ क्रमांक: २०१३
