श्री गुरुचरित्र
सारांश: प्रसंगानुरुप प्रत्येक अध्यायाची चित्रे प्रत्येक अध्यायाचा सुबोध मराठी सारांश फलश्रुती, पठण व पारायण विषयक सूचना आणि गुरुगीता यांसह. श्री सरस्वती गंगाधर विरचित 'श्रीगुरुचरित्र' हा अत्यंत प्रासादिक, रसाळ ग्रंथ आहे. गुरुसंस्थेचे माहात्म्य वर्णन करणारा हा ओवीबद्ध ग्रंथ कालातीत आहे. नामधारकाच्या प्रश्नाचे निमित्त करून सिद्धांनी त्रिमूर्ती दत्ताची अवतार कथा, अंबरीष कथा, धौम्य ऋषींची कथा, इत्यादी पौराणिक कथांचे वर्णन जरी केले, तरी गुरुचरित्राचा मुख्य विषय श्रीनृसिंह सरस्वती ह्यांचे अलौकिक अवतारी चरित्र सांगणे हा आहे. श्रीदत्तात्रेय, श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्रीनृसिंह सरस्वती ह्या तीन अवतारी पुरुषोत्तमांचे अवतारकार्य ह्या अपूर्व ओवीबद्ध चरित्रग्रंथात प्रकट झालेले आहे. गुरुचरित्राच्या पहिल्या नऊ अध्यायांत श्रीपाद श्रीवल्लभांचे अवतारकार्य प्रकट झालेले आहे. तर दहाव्या अध्यायात त्यांच्या निर्गुण अस्तित्वाचे वर्णन करून नंतर अकराव्या अध्यायापासून श्रीनृसिंह सरस्वतींचे अवतारकार्य विस्ताराने शेवटपर्यंत प्रकट झालेले आहे. दत्तसंप्रदायाचे तत्त्वज्ञान आणि आचारधर्म ह्यांचे सखोल विवरण करणारा हा एक अजोड ग्रंथ आहे.
लेखक: सरस्वती गंगाधर
संदर्भ क्रमांक: १०८७
