युगद्रष्टे छत्रपती शिवाजी महाराज
सारांश: मध्ययुगामध्ये हिंदुस्थानच्या इतिहासात ज्या घराण्याने पराक्रम गाजविला त्या भोसले कुळात शिवाजी महाराजांचा जन्म झाला. महाराजांनी महाराष्ट्रात 'हिंदवी स्वराज्य' स्थापन करून हिंदुस्थानालाच नव्हे तर साऱ्या जगाला चकित करून सोडले. श्रीसमर्थ रामदास स्वामी शिवरायांविषयी लिहितात,
शिवरायाचे आठवावे रूप। शिवरायाचा आठवावा प्रताप।
शिवरायाचा आठवावा साक्षेप। भूमंडळी॥
शिवरायाचे कैसे चालणे। शिवरायाचे कैसे बोलणे।
शिवरायाचे सलगी देणे। कैसी असे॥
सकल सुखाचा त्याग। करुनि साधिजे योग।
राज्य साधनाची लगबग। कैसी असे॥
त्याहूनी करावे विशेष। तरीच म्हणावे पुरुष।
याउपरी आता विशेष काय लिहावे॥
लेखक: डॉ. गो. रा. कुलकर्णी, अवंतिका कुलकर्णी
संदर्भ क्रमांक: २००७
