खरा संभाजी
सारांश: जगातील पहीले बुलेट प्रुफ जॅकेट युद्ध भुमीवरील गरज लक्षात घेऊन फक्त एका महिन्यात तयार करणारा जगातील पहिला तरंगता तोफखाना तयार करणारा. जंजिरा जिंकण्यासाठी उसळत्या सागरात आठशे मीटरचा सेतू बांधणारा. आदिलशाही, कुतुबशाहीची एकजुट करणारा आणि त्याचवेळी सिद्धी. पोर्तुगीज व इंग्रजांना त्यांच्या बिळात कोंडुन ठेवणारा त्याच वेळी मोघलांचा कर्दनकाळ ठरलेला. दुष्काळ ग्रस्त गावांना कायमस्वरुपी - पाणी मिळावे म्हणुन डोंगर पोखरून जल नियोजन करणारा. उत्तर प्रदेशापासुन दुर तामिळनाडु कर्नाटक आणि राजस्थान प्रांतातील लोकांनाही स्वराज्यासाठी एकत्र करणारा इतर धर्माचा मान सन्मान राखणारा आणि धर्मांतरावर कायदेशीर बंदी घालणारा बाल मजुरी व बेटबिगारी विरुध्द कायदा करणारा. शिवप्रभुंची इच्छा पुर्ण करण्यासाठी राज्याभिषेक झाल्यावर पंधराव्या दिवशीच दुर मध्यप्रदेशातील चुन्हाणपुरवर छापा घालणारा स्वराज्याला आर्थिक संपन्न ठेवणारा. देहू ते पंढरपुर आषाढीवारीला संरक्षण व अर्थ पुरवठा करणारा दुष्काळ ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीसाठी पीक कर्ज योजना राबविणारा. सैनिकांच्या उत्पन्नाला इतर मार्गाने हातभार लागावा म्हणुन चरईची सवलत कायम ठेवणारा. आपले आरमार सुसज्ज करण्यासाठी परदेशातुन तंत्रज्ञान व प्रशिक्षित लोकांचे सहकार्य घेणारा. स्वतःचे आधुनिक बारुदखाने तयार करुन स्वदेशीचा महामंत्र देणारा. खरा संभाजी.
लेखक: प्रा नामदेवराव जाधव
संदर्भ क्रमांक: २०१२