ब्राह्मणग्रंथ


सारांश: ब्राह्मणे अर्थात् ब्राह्मणग्रंथ हे वैदिक वाङ्मयाचे एक प्रधान अङ्ग आहे. वेदाचे दोन भाग आहेत - १ ) संहिता, २) ब्राह्मणे. संहिता या मंत्ररूप असतात, तर ब्राह्मणे व्याख्यानरूप वा विधानरूप असतात. वेद आणि ब्रह्माचे ज्ञान ज्यांच्यामुळे होते, त्यांना ब्राह्मणग्रंथ असे म्हणतात. एका अर्थी यज्ञकर्मावरील याज्ञिकांच्या विवेचनांचा मार्गदर्शक संग्रह म्हणजे ब्राह्मण ग्रंथ असेही म्हणता येईल. 'ब्रह्मणं ब्रह्मसङ्घाते वेदभागे नपुंसकम्।' या वचनाप्रमाणे ब्राह्मण हा शब्द नपुंसकलिंगी असेल, तेव्हा त्याचा अर्थ ग्रंथ असा होतो. तो ब्राह्मणग्रंथांना उद्देशून वैदिक वाङ्मयात उपयोजिला आहे. ब्राह्मणग्रंथ म्हणजे यज्ञशास्त्राचेच ग्रंथ होत. ब्राह्मणग्रंथ यज्ञशास्त्राची तांत्रिक बाजू सुस्पष्ट करतात. वेद आणि वेदोत्तर कालखंडात त्या त्या वैदिक शाखेची आणि संप्रदायाची स्वतंत्र ब्राह्मणे निर्माण झाली. मंत्ररूप संहितेत प्रत्यक्षात नसलेल्या, पण अनुस्यूत असलेल्या तपशीलाचा विस्तार ब्राह्मणग्रंथांनी केला आहे. ब्राह्मण ग्रंथात मुख्यत्वे तीन विभाग असतात. पहिला कर्मकांडाचा, दुसरा अर्थविभागाचा आणि तिसरा ब्रह्मकांडाचा.

लेखक: शंकर अभ्यंकर

संदर्भ क्रमांक: १०२०

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र