कोळीगीतं


सारांश: झिंगायला लावणारं संगीत, हा कोळी सांस्कृतिकचा प्राण आहे. आणि शाहीर विठ्ठल उमप यांची तर अशा गीतांवर विशेष हुकमत आहे. एकतर त्यांच्या आवाजात एक कोळी तांडेल लपलाय आणि गाणी लिहिताना, गाणी बेतताना, त्यातली सगळी खुमारी आणि किनाऱ्यावरचा मुक्तमोकळा ‘कोळी' आवाज त्यांच्या गाण्यात उमटतो. मराठीयेतर जगाला आपण, हक्कानं आणि अभिमानानं ऐकवू शकतो ते कोळीसंगीतच. आफ्रिकन, कॅरेबियन, पॉप, स्पॅनिश, संगीताशी टक्कर देऊ शकतं आपलं कोळीसंगीतच. पण सर्वसामान्यांना नि विशेषतः बहुजनांना आवडणाऱ्या ह्या संगीताच्या नावाने अभिजनवर्ग मात्र बोटे मोडीत असतो. पण ह्याच कोळीसंगीतात अधिकाधिक लोकप्रिय काम केलंय मराठीतील अनेक शाहिरांनी आणि त्यात सर्वात उठून दिसणारे शाहीर म्हणजे शाहीर उमपदादा. चाळीस वर्षांपूर्वी, दादांचं मी 'ये दादा आवर ये' ऐकलं नि वाटलं की हा कोणी अस्सल कोळीदादाच आपलं गाणं गातोय. मला खात्री आहे, अगदी जातीचे कोळीही दादांच्या आवाजाला फसले असतील. एकूण, ह्या पुस्तकाच्या निमित्ताने उमपदादांच्या फेट्यात आणखी एक शिरपेच खोचला जाणार आहे. तसे शब्द ही गोष्ट शाहिरांना परकी नाही. पण त्यांचा सारा भार असतो स्वरांवर... या पुस्तकाच्या रूपाने, शाहिरांची शब्दांवरची हुकमतही सिद्ध होणार हे नक्की!

लेखक: शाहीर विठ्ठल उमप

संदर्भ क्रमांक: ५००१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र