स्मृतिग्रंथ
सारांश: मानवी जीवनाचा आचार, व्यवहार आणि प्रायश्चित्त (अर्थात कायदा मोडल्यास होणारी शिक्षा) यांचे निश्चित नियम सांगणारे ग्रंथ म्हणजे 'स्मृती' होत. भारतात श्रुतीनंतर (वेदसंहिता, ब्राह्मणे, आरण्यके व उपनिषदे यानंतर) स्मृतिग्रंथांनाच अत्यंत महत्त्व आहे. हिंदु धर्माचे मूळ वेद आहे. वेदालाच श्रुती असे म्हणतात. वैदिक दिव्यज्ञानाचा अनुभव साररूपाने द्रष्ट्या ऋषींनी स्मरणासाठी ग्रथित केला म्हणून श्रुतीनंतर सिद्ध झालेल्या या ग्रंथांना 'स्मृती' असे नाव मिळाले. अध्यात्मदर्शनाचा पाया शुद्ध आचार आहे. तो आचार आणि त्याच्या नीतीरूपी, सदाचाररूपी सीमारेषा नियमबद्ध करण्याचे कार्य स्मृतींनी केले. भोगवादी विचारधारा वरवर इंद्रियांना कितीही सुखावह वाटली तरी शेवटी ती विषकन्येप्रमाणे घात करते. त्यागवादी आचार मानवाला आत्मोन्नत करतो. त्यासाठी धर्म आणि मोक्ष हे प्रधान पुरुषार्थ आणि अर्थ- काम दुय्यम पुरुषार्थ करून मानवाने जीवनाची वाटचाल कशी करावी, याचे मार्गदर्शन स्मृती करतात.
लेखक: शंकर अभ्यंकर
संदर्भ क्रमांक: १०२४