महाराणा प्रताप


सारांश: धैर्यशाली व पराक्रमी पुरुषांची चरित्रे कोणाला आवडत नाहीत ? आपल्या हिंदुस्थान देशात अनेक मोठमोठी माणसें होऊन गेली आहेत, त्यांना आपण मोठे का वाटतो हे त्यांची चरित्रे वाचून किंवा ऐकून आपणास सहज समजण्यासारखे आहे, शिवाय त्यांच्या चरित्रांचा अभ्यास केल्याने आपले चरित्रही थोडेफार त्यांच्या चरित्राइतके मोठे व तेजस्वी होण्याचा संभव असतो. या जगात येऊन काही एक पुरुषार्थ न करता भित्रेपणाने आपले आयुष्याचे दिवस घालविणे ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे व अशा रीतीने आपले जीवित निस्तेज व सत्त्वहीन न व्हावे म्हणून प्रत्येक मनुष्याने शूरवीर पुरुषांची चरित्रे उदाहरण म्हणून आपल्या डोळ्यांसमोर नेहमी ठेविली पाहिजेत. प्रताप हा एक महा पराक्रमी योद्धा होऊन गेला. त्याच्यावर रोमांच उभे करणारी अशी अनेक संकटे व दुःखे कोसळली तरी पण त्याने स्वधर्म, स्वदेशाभिमान आणि आपले सत्यव्रताचरण कधीही सोडिले नाही. जी माणसं संकटे ओढवली असता घाबरून जाऊन सत्याची कांस सोडून देतात ती कधीही मोठेपणात चढत नाहीत.

लेखक: परशुराम काटदरे 

संदर्भ क्रमांक: २०२४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र