प्राचीन भारत


सारांश: राष्ट्र जीवनात इतिहासाचे महत्त्व फार असते. भविष्यकाळासाठी तो मार्गदर्शक ठरत असतो आणि भूतकाळातील चुकांची पुनरावृत्ती वर्तमानकाळी होऊ नये याची खबरदारी घेण्यास तो प्रवृत्त करीत असतो. म्हणून आपणच आपला इतिहास लिहायचा असतो. जित्यांनी जेत्यांचा इतिहास त्यांना अनुकूल ठरेल अशा पद्धतीने रचलेला असतो. ब्रिटिशांनी असेच केले. व्हिन्सेंट स्मिथच्या 'ऑक्सफोर्ड हिस्टरी ऑफ इंडिया'त भारताच्या इतिहासाला अलेक्झांडरच्या स्वारीपासून सुरूवात झाली असे दाखविले आहे. गेल्या शंभर वर्षात झालेल्या पुरातत्त्वीय संशोधनामुळे, अभिलेखांच्या वाचनामुळे, कागदपत्रांच्या पडताळणीमुळे शिवाय ऋग्वेदादी ग्रंथांच्या चिकित्सक त्या केलेले कितीतरी अभ्यासामुळे पाश्चात्यांनी प्रस्थापित केलेले कितीतरी सिद्धांत आज अस्वीकारार्ह ठरले आहेत. भारताला फार प्राचीन आणि तोही वाखाणणीय इतिहास आहे, सरस्वती नदीच्या काठी पहिल्या संस्कृतीचा उदय झाला आहे, मोहेनजोदडो, हडप्पा, लोथल, राखीगडी, फर्माना येथे सापडलेल्या मुद्रावरून आणि अन्य पुराव्यावरून आर्य भारतीयच होत, ते मध्य आशियातील वा रशियातील कुठल्यातरी प्रदेशातून आलेले नाहीत हे ही आता सर्वमान्य होते आहे. बट्राण्ड रसेल म्हणतात शास्त्रीय ज्ञान नेहमी अनिश्चितपणे खात्रीचे असते. म्हणजेच ते त्या त्या वेळी स्वल्पविरामासारखे असते; पूर्णविरामासारखे नसते. इतिहासासंबंधीही हे खरेच मानावे लागते. तसेच नव्याने उपलब्ध झालेल्या पुराव्यावरून इतिहासाची पुनर्मांडणी करावी लागत असते. त्यासंबंधीचे संकेत प्रस्तुत पुस्तकात वाचक व विद्यार्थ्यांना आढळतील.

लेखक: डॉ. गो. बं. देगलूरकर

संदर्भ क्रमांक: २००१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र