राष्ट्रमाता जिजाऊ


सारांश: छत्रपती शिवाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास जगाला ज्ञात आहे. गेल्या तीनशे वर्षांत जगातील प्रमुख योद्ध्यांचे आदर्शस्थान म्हणजे शिवराय. जगाला लोकशाहीप्रधान राज्यव्यवस्था देणारे शिवराय. समाजकारण, अर्थकारण, धर्मकारण, राजकारण, सांस्कृतिकीकरण, न्यायव्यवस्था, शिक्षण, भाषा असे एकही क्षेत्र नाही की जेथे शिवरायांच्या कार्याचा ठसा नाही. मध्ययुगीन कालखंडातील जागतिक इतिहासातील सर्वगुणसंपन्न एकमेव व्यक्ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. पण या व्यक्तीला हे जागतिक अढळ स्थान प्राप्त करून देणाऱ्या त्यांच्या माता व मानवतावादी आदर्श जिजामाता यांच्याबद्दल आम्हाला जास्त माहिती नाही. शिवबास जन्म देण्यापासून ते त्यांना छत्रपतीपदापर्यंत पोहोचविणारी एकमेव व्यक्ती म्हणजेच शिवमाता राजमाता राष्ट्रमाता जिजामाता होत. जिजामातेच्या निर्धाराचे सत्यचित्र म्हणजेच शिवचरित्र. 'शिवबा, अफझलखानाच्या भेटप्रसंगी तुम्ही कामी आलात तर भीती बाळगू नका. तुमच्या पाठीमागे मी बाळशंभूस छत्रपती बनवून स्वराज्याची निर्मिती करीन.' हा दृढ निर्धार मेंदूत सतत जागृत ठेवणारी जिजाऊ! जिजामाता! शिवरायांच्या आयुष्यातील पन्नास वर्षापैकी पंचेचाळीस वर्षे त्यांच्यावर मायेची नजर ठेवणारी राजमाता म्हणजेच जिजाऊ!

लेखक: पुरुषोत्तम खेडेकर 

संदर्भ क्रमांक: २००३

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र