सावरकर ज्ञात आणि अज्ञात
सारांश: शिवराय दिल्लीला गेले ते आपल्या शत्रूची बलस्थाने कोणती ते पाहण्यासाठी, म्हणजे युद्धात त्या बलस्थानांवर आघात करता येईल नि शत्रूला पराभूत करता येईल. तसाच हेतू ठेवून ब्रिटिशांच्या सत्तेची बलस्थाने जाणून घेण्यासाठी सावरकरंनी आपल्या शत्रूच्या शिबिरात म्हणजेच लंडनमध्ये प्रवेश केला शिवरायांप्रमाणे हाती शस्र घेऊन शत्रूला आव्हान दिले. पौरुषत्वाची राखरांगोळी झाली होती. शस्राविषयी घृणा निर्माण करून अहिंसेचे मवाळपणाचे स्तोम माजवले होते. त्याला छेद देऊन त्यांनी शस्रबळावर शत्रूला नामोहरम करण्याचा निर्धार केला. त्यांच्या या प्रयल्नाला यश आले. आपण, आपले स्वराज्य निर्माण केले. सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे देशाचे विभाजन झाले. अखंड हिंदुस्थानच्या स्वातंत्रयाचा ध्यास घेणारे सावरकर एकाकी पडले. स्वातंत्र्य- लढ्याचा हा इतिहास आजच्या नव्या पिढीच्या दृष्टीने काही प्रमाणात ज्ञात आहे तर काही प्रमाणात अज्ञात आहे. सावरकरांची या लढ्यातली भूमिका, त्यांची राजनीती, त्यांची ध्येये, धोरणे, त्यांचे लंडनमधील कार्य याविषयीचा इतिहास नव्या पिढीपर्यत पोचावा या भावनेने या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे.
लेखक: डॉ. सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परुळकर
संदर्भ क्रमांक: २०१७
