दास मारुति? नव्हे, वीर हनुमान्!
सारांश: मारुति म्हणजेच हनुमान् हे कित्येक लोकांना माहित नसते. बजरंग बलि हे त्याचे नांव व्यायाम करणारांना माहीत असते; पण त्याचा नेमका अर्थ मात्र ठाऊक नसतो. बजरंग हे नांव हिंदी भाषिक लोकांमध्ये चांगलेच परिचित आहे, पण ते नांव मूळ संस्कृत नाम ‘वज्रांग' पासून उद्भवले आहे हेहि कुणास ठाअक नसते. मी बालपणापासून व्यायाम करीत असल्यामुळे मला हे माहित आहे. वज्रांग म्हणजे वज्रासारखे कठीण, भक्कम अंग असणारा होय. तसे भक्कम शरीर व्हावे म्हणूनच व्यायाम केला जातो. व्यायाम करतांना ‘जय बजरंग’ असे वारंवार म्हटले जाते. प्रत्येक व्यायामशाळेत हनुमानाची मूर्ति किंवा चित्र तरी लावलेले असतेच. त्याला नमस्कार करूनच व्यायामाचा आरंभ केला जातो.
लेखक: डॉ. पद्माकर विष्णु वर्तक
संदर्भ क्रमांक: १०११
