प्रतापसूर्य थोरले बाजीराव पेशवे
सारांश: "वेगात दौडले वीर मराठे सात" ही त्या शूर प्रतापराव गुजर व सैनिकांना उद्देशून लिहिलेली कविता आपल्या सर्वांना माहीतच आहे. त्यांनी स्वत:ची आहूती त्या युद्धाच्या होमात दिली. तशाच झपाटलेपणाने आता एका . मराठी वीराची लेखणी कागदरूपी समरांगणावर लढत राहिली, त्याच आवेशात आणि लढाई जिंकली. अर्थात ही लेखणीची लढाई अशा वीराबद्दल होती कि जो प्रत्येक लढाई जिंकतच गेला. होय ! पहिला बाजीराव पेशवाच असा माणूस आहे कि त्याने जेवढ्या लढाया केल्या त्यात विजय मिळविला. बाजीराव रणांगणावर सैन्याची व्यूहरचना जशी अतिशय बुद्धीचातुर्यान करे तशाच बुद्धीकौशल्याने ह्या लेखणीवीराने बाजीरावांसारख्या उमद्या शूराचे शौर्य, युद्धाची आंखणी, बुद्धीकौशल्य, सौंदर्य, पंतप्रधानपदाची जाणीव, गुरुवरील निष्ठा इ. गुणांची रचना इतक्या सर्वांगाने केली आहे कि बाजीरावांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वार्थाने ओळख होते. एरवी आपण कुठे थोडे वाचलेले, कुणाकडून ऐकलेले असते. अशामुळे चरित्रातल्या कित्येक गोष्टी आपल्याला माहीत नसतात. त्याचा अर्थ, बारकावे कळत नाहीत.
लेखक: डॉ. पद्माकर विष्णु वर्तक
संदर्भ क्रमांक: २०२७
