श्री ज्ञानेश्वरी
सारांश: श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी तर्फे प्रकाशित श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रत. शालिवाहन शके १२१२, नेवासे गावात भगवद्गीतेवर संत श्री ज्ञानेश्वर महाराजांनी जे भाष्य केले त्यालाच ज्ञानेश्वरी किंवा भावार्थदीपिका म्हटले जाते. सर्वसामान्यांसाठी असणारा गीतेवरील ज्ञानेश्वरांचा हा भावार्थाने परिपूर्ण ग्रंथ मराठीतील सर्वश्रेष्ठ ग्रंथ आहे. संत श्री नामदेव महाराज ज्ञानेश्वरीचे माहात्म्य सांगताना म्हणतात,
नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी। एक तरी ओवी अनुभवावी॥
त्याचप्रमाणे संत श्री एकनाथ महाराज म्हणतात,
भाव धरुनिया वाची ज्ञानेश्वरी। कृपा करी हरी तयावरी॥
स्वमुखे आपण सांगे तो श्रीविष्णु। श्रीगीता हा प्रश्नु अर्जुनेशी॥
तेचि ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे। भय कळिकाळाचे नाही तया॥
एका जनार्दनी संशय सांडोनी। दृढ धरी मनी ज्ञानेश्वरी॥
म्हणूनच प्रत्येक मराठी भाषकाने हा सर्वश्रेष्ठ ग्रंथ अनुभवलाच पाहिजे.
लेखक: संत ज्ञानेश्वर
संदर्भ क्रमांक: १०९६
