लोकप्रिय पुस्तके
बचत गट
सारांश: बचत गट म्हणजे काय, त्यांचे नियम व कार्यपद्धती, बचतगटांना भेडसावणाऱ्या समस्या अशा विविध प्रकरणांतून लेखकाने बचत गटाची स्थापना आणि नंतरचे व्यवस्थापन यासंबंधी थोडक्यात केलले मार्गदर्शन वाखाणण्याजोगे आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, बचत गटासंबंधी ही सर्व तांत्रिक माहिती पुरवल्यानंतर प्रत्यक्ष गट स्थापन करण्यासाठी तयार कराव्या लागणाऱ्या कागदपत्रांचे, शासकीयव निमशासकीय अर्जांचे विहित नमुनेही लेखकाने पुस्तकात उपलब्ध करून दिले आहेत. हे अर्ज वापरून महिलांना, अल्पशिक्षितांना नव्याने घरगुती स्वरूपात उत्पादन प्रकल्प सुरू करण्याची इच्छा असणाऱ्या तरुण-तरुणींना आणि विशेषतः महिलांना नवा बचत गट स्थापन करणे निश्चितच सोपे जाईल. याचबरोबर नमुना अर्ज भरताना कोणत्या गोष्टी ध्यानात ठेवायला हव्यात, याविषयीही तपशीलवार माहिती दिली आहे. लेखक: डॉ. प्रमोद जोगदेव संदर्भ क्रमांक: ६०२२
श्री शिवलीलामृत
सारांश: शिवलीलामृतातील अकरावा अध्याय म्हणजेच रुद्राध्याय नित्य उपासनेसाठी या पुस्तकात प्रस्तुत केला आहे. या अध्यायाची फलश्रुती पुढीलप्रमाणे सांगितली आहे. या अध्यायाचें करितां अनुष्ठान। तयासी नित्य रुद्र केल्याचें पुण्य। त्याचे घरीं अनुदिन। ब्रह्मानंद प्रगटेल॥ प्रकाशक: प्रोफिशंट पब्लिशिंग हाऊस संदर्भ क्रमांक: ११३८
चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड
सारांश: दुष्काळातही टिकून उत्पन्न देणार्या पिकांमधे किंवा झाडांमध्ये चिंच, शेवगा व कडीपत्ता या तिन्हींचा समावेश होतो. या विषयासाठी अभ्यास व निरीक्षणे करून कृषिभूषण सन्मानधारक वि. ग. राऊळ यांनी या पिकांचे महत्त्व, अभिवृद्धी, खते, पाणी, ववस्थापन, निगा, काढणी, प्रक्रिया, विक्री, शंकासमाधान अशी सर्व माहिती देणारे पुस्तक लिहिले आहे. लेखक: वि.ग.राऊळ संदर्भ क्रमांक: ४०७८
रान भाज्या
सारांश: रानभाज्या' ही कल्पना सुचली तीच मुळी भारंगीची भाजी खात असताना. ज्या ठिकाणी पाऊस जास्त पडतो, त्या भागात साधारणपणे ही वनस्पती दिसते. परंतु मनात प्रश्न निर्माण झाला की ही भारंगी किती जणांना माहिती आहे ? एवढी रुचकर भाजी असूनही ती सर्वपरिचित नाही व अशा कितीतरी भाज्या आहेत, की त्या बहुतेकांना माहीत नाहीत. कितीतरी भाज्या सांगता येतील, की त्या प्रचलित नाहीत; परंतु खाण्यास योग्य आहेत. त्यांपैकी मला जेवढ्या माहीत झाल्या तेवढ्या मी घेतल्या. त्यातील योग्य माहिती वाचकांनी घ्यावी. उणिवा आहेतच. त्यांची दखल घेतली जाईल. परंतु याचे बी वगैरे लगेच कोठे उपलब्ध होऊ शकेल, असे वाटत नाही. सध्या कोहळा वगैरे मिळू शकतो. परंतु स्थानिक जंगलातून जाणकारांकडून माहिती करून घेऊन, खाद्य व अखाद्य भाजी कोणती यांची माहिती करून घ्यावी व मगच त्या वनस्पतींचा वापर करावा. पारंपरिक शेतीला पर्याय हवा, असे जो तो सध्या बोलतो आहे. तेव्हा सध्या बेचव, कीटकनाशकांनी युक्त अशा भाज्यांना काही पर्याय सापडू शकेल काय, हेही उत्तर शोधण्याचा यामागे प्रयत्न आहे. या वनस्पतींवर कोठे ना कोठे निरनिराळ्या दृष्टिकोणांतून संशोधन सुरूही आहे, ...
नित्यपाठाचे अभंग
श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय
अर्थसखी
सारांश: ज्ञानप्रबोधिनी ही संस्था सामाजिक स्तरावर महत्वपूर्ण काम करते आहे, हे नव्याने सांगायची गरज नाही. याच संस्थेच्या माध्यमातून पंचवीस तीस वर्षांपूर्वी पुण्याच्या वेल्हे भागात ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणाची एक चळवळ उभी राहिली. त्यातील महत्वपूर्ण शिलेदार म्हणजे सुवर्णा गोखले. ज्ञानप्रबोधिनीत शिकलेल्या, शहरी वातावरणात वाढलेल्या, सुरुवातीला ग्रामीण प्रश्नांचे गंधही नसलेल्या सुवर्णाताईंचा प्रवास थक्क करणारा आहे. हा प्रवास इतका उद्बोधक आहे की, त्या प्रवासाचे कथन करायला त्यांना आज रिझर्व बँक, अनेक राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर बोलावले जाते. अर्थसखी या पुस्तकात मांडलेली ग्रामीण महिला व त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची वाटचाल कोणत्याही स्त्रीस किंवा पुरुषास प्रेरित करणारी आहे. लेखक: सुवर्णा गोखले संदर्भ क्रमांक: ६०२३
काटकसर व बचत
सारांश: 'ओरिसन स्वेट मार्डेन' यांच्या एकॉनॉमी या इंग्रजी पुस्तकाचा भावानुवाद. प्रत्येक कुटुंबवत्सल माणसाच्या जीवनातील अतिशय महत्त्वाच्या प्रश्नावरील हे पुस्तक आहे. या पुस्तकात सांगितलेला काटकसरीचा व बचतीचा मंत्र जो पाठ करेल सतत जपेल त्याला आयुष्यात सुख-समाधान व शांतता लाभेल. आपल्या समाजात काटकसर करणाऱ्या माणसाची हेटाळणीच केली जाते. त्याला चिक्कू म्हणतात. पण ज्याला काटकसर करायची आहे त्याने या लोकनिंदेला तोंड दिलेच पाहिजे. कारण जर एखादे संकट आले तर त्यातला एकही तुमच्या मदतीला येत नाही. पण काटकसर आणि बचत करून एखाद्या माणसाला फार मोठा उद्योजक किंवा अब्जाधीश होता येणार नाही. कारण यशस्वी कारखानदार होण्यासाठी केवळ काटकसरीशिवाय इतर अनेक गुणांची जरूर असते. काटकसरीची सवय ही त्या गुणांपैकी एक आहे. परंतु सर्वसामान्य माणसाचे आयुष्य उत्तम जाण्यासाठी काटकसरीची सवय निश्चितच उपयोगी पडते. काटकसरी माणसाचे मन शांत राहते व ही फार मोठी देणगीच आहे. सामान्य माणसाला काटकसरीची जरुरी का आहे ? हे अनेक उदाहरणे देऊन या पुस्तकात सांगितले आहे. जो या पुस्तकातील सुचनांचा अभ्यास करून अंमलबजावणी करेल. त्याचा खूप...
निळावंती
ठिबक सिंचन तंत्र
सारांश: ठिबक सिंचन ह्या विषयावरील मराठी भाषेतले माहितीपूर्ण पुस्तक . ठिबक सिंचनाचे तंत्रज्ञान, वैशिट्ये, प्रवाही सिंचन व ठिबक सिंचनातील फरक याविषयी चर्चा करून ठिबक सिंचनातील महत्त्वाचे घटक व त्यांच्या कार्याचे सविस्तर वर्णन आकृतीसह दिले आहे. ठिबक सिंचन संचाची कार्यक्षमता संचाच्या डिझाईनवर अवलंबून असते. डिझाईनची तत्त्वे आणि रीत उदाहरणासहित ह्यामध्ये करून दाखवली आहेत. प्रत्येक पिकाला किती लिटर पाणी द्यावे हे तक्त्याच्या स्वरूपात दाखवले असून ठिबक सिंचनाचे पाळीपत्रक, संचातील महत्त्वाच्या घटकांचे निरीक्षण, ठिबक संचाचे मूलमापन यांची सविस्तर चर्चा, संचाची निगा व दुरुस्तीचे वेळापत्रक यांच्या समावेशामुळे हे पुस्तक निश्चितच मौल्यवान झाले आहे. लेखक: ज्ञा.गो. होळसंबरे संदर्भ क्रमांक: ४०७४