श्रीमद्भगवद्गीता


सारांश: हिंदू धर्म, हिंदू संस्कृती आणि हिंदू तत्त्वज्ञान यांचा महाप्राण, साक्षात् आत्मा म्हणजे श्रीमद्भगवद्गीता होय. 'श्रीमद्भगवद्गीता' ही केवळ भारतीय तत्त्वज्ञानाचाच नव्हे, तर वैश्विक तत्त्वज्ञानाचा मुकुटमणी आहे. पर्वतात जसा हिमालय, पक्ष्यात जसा गरूड, नक्षत्रात जसा चंद्र, ताऱ्यात जसा सूर्य, जलाशयात जसा महासागर, व्यापक पदार्थात जसे आकाश, अवतारात जसे प्रभू रामचंद्र वा भगवान् श्रीकृष्ण - तशी तत्त्वज्ञानात केवळ गीताच! असे श्रेष्ठ तत्त्वज्ञान जगात दुसरे नाहीच. स्वतः भगवान् श्रीकृष्णांनी गीतेची अलौकिक थोरवी एका श्लोकात गीतेतच सांगितली आहे,
राजविद्याराजगुह्यं पवित्रमिदमुत्तमम्। 
प्रत्यक्षावगमं धर्म्यं सुसुखं कर्तुमव्ययम्॥
'हे ज्ञान सर्व विद्यांचा राजा, सर्व गुह्यांचाही राजा, अतिशय पवित्र, उत्तम, प्रत्यक्ष फलदायी व धर्मयुक्त आहे. साधन करावयास फार सोपे व अविनाशी आहे.' समजावून घेण्यास इतके सुलभ, आचरण्यास इतके सुगम आणि प्रत्येक मानवाला आत्मोन्नतीकडे नेणारे गीतेसारखे दुसरे साधन नाही. 

लेखक: शंकर अभ्यंकर 

संदर्भ क्रमांक: १०१४

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र