पानिपतचा रणसंग्राम
सारांश: पानिपतच्या युद्धातला पराभव एकूणएक मराठी माणसाच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यामुळे पानिपतच्या विषय निघाला की आजही त्वेषाने मुठी वळतात आणि पानिपतच्या पराभवाची कारणं परत परत शोधली जातात. साहजिकच १४ जानेवारी २०११ला या युध्दाला २५० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने तद्विषयक चर्चेला पुन्हा ऊत आला. त्याचाच एक भाग म्हणून अनेकांनी लेख लिहिले. काहींनी पुस्तकही लिहिली. असंच एक नुकतंच प्रकाशित झालेलं पुस्तक म्हणजे डॉ. सच्चिदानंद शेवडे व दुर्गेश परुळकर लिखित आणि 'नवचैतन्य प्रकाशन' प्रकाशित 'पानिपतचा रणसंग्राम' हे होय.
लेखक: डॉ. सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परुळकर
संदर्भ क्रमांक: २०२५
