मनोरंजक सस्तन प्राणी


सारांश: प्राणिसृष्टीत उत्क्रांतीच्या सर्वांत वरच्या टप्यावर सस्तन प्राणी आहेत. अनेक अजब, विचित्र आणि विविधतेने नटलेले सस्तन प्राणी, त्यांच्या सवयी, वर्तन, जीवन जगण्याच्या पद्धती पाहिल्यावर निसर्गाच्या किमयेचे कौतुक वाटते. अनेक सस्तन निशाचर आणि झाडनिवासी आहेत. प्लॅटिपससारखे अप्रगत सस्तन प्राणी पक्ष्यांप्रमाणे अंडी घालतात. साळिंदर, काटेरी मूंग्याखाऊ, खवल्या मांजर, आर्माडिलो यांसारख्या प्राण्यांवर संरक्षणासाठी केसऐवजी साक्ष्ण काटे, खवले किया चिलखत असते. वटवाघूळ, उडणाऱ्या खारी आकाशात उड्डाण घेतात, तर अनेक सस्तन बिळांत सहतात. भूतलावरचा प्रचंड व सर्वात मोठा प्राणी निळा देवमासा समुद्रात राहतो. मानवाचे निकटचे नातेवाईक म्हणजे विविध प्रकारची माकडे: त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण वर्तन थक्क करणारे आहे. वाघ, सिंह, चित्ता, बिबळ्या यांसारख्या हिल श्वापदांचे महत्त्व निसर्गात अनन्यसाधारण असेच आहे. एक ना दोन, अशा अनेक अद्भुत, आगळ्यावेगळ्या व विस्मयकारक सस्तन प्राण्यांची माहिती वाचकांना मनोरंजक वाटल्याशिवाय राहणार नाही.

लेखक: नलिनी पवार, डॉ. किशोर पवार

संदर्भ क्रमांक: ४०२६

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र