शूर शिवबा


सारांश: प्रस्तुत पुस्तकात धीरज नवलखे  यांनी लहान मुलांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा व चरित्र समाविष्ट केलेले आहे. 
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। 
अभ्युत्थानमधर्मस्य तदाऽऽत्मानं सृजाम्यहम्॥ 
परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। 
धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे॥
श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगितलेल्या या श्लोकाचा अर्थ आहे, जेव्हा-जेव्हा धर्माला ग्लानी म्हणजे झोप येईल तेव्हा-तेव्हा धर्माचे उत्थान करण्यासाठी, साधू जनांचे रक्षण करण्यासाठी, दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि संस्थापन करण्यासाठी मी या धरतीवर अवतरीत होत राहीन. गीतेतील या वचनाप्रमाणेच या मराठी भूमीत आपल्या शिवरायांचा जन्म झाला असावा, असे वाटते. कारण, ज्याप्रमाणे कंस आणि त्याच्यासारख्या इतर राक्षसांच्या क्रूरतेमुळे सगळी धरिती त्राही-त्राही करत होती, त्याचप्रमाणे मुघलांच्या राजवटीमुळे सारी मराठी भूमी त्यावेळी छळली जात होती. आदिलशाही आणि निजामशाही यांच्या लढाया, युद्धे यामध्ये गरीब जनता पिळली जात होती. दोन्ही राजवटीतील सैन्ये महाराष्ट्रातील गावेच्या गावे लुटून नेत होती. घरे, वस्त्या, पाडे जाळून बेचिराख करून टाकत होती. काबाडकष्ट करून जगणारे सामान्य लोक नाहक होरपळले जात होते. करांच्या ओझ्याखाली भरडले जात होते. मुघलांचे सैन्य स्त्रिया - बालकांवरदेखील जुलूम करण्यात चुकत नव्हते. सामान्य रयतेला 'कुणीही यावे आणि लुटून जावे' अशी स्थिती झाली होती. त्यात निसर्गाने दुष्काळाची चादर अवघ्या प्रांतावर पांघरली होती. भुकेने व्याकूळ होऊन लोक प्राण सोडत होते. अन्नान्नदशा झाली होती. गरीब-दुबळ्यांचा कोणी वाली उरला नव्हता. जणुकाही सैतानी अधर्माचे तांडव सुरू होते आणि धर्माला मात्र काळझोप लागली होती... काळझोप ! आणि मग...

लेखक: धीरज नवलखे 

संदर्भ क्रमांक: २००५

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र