दयानंद
सारांश: माणसाच्या मनात, अनेक आकांक्षा बसत असतात. त्यातच आपल्याला कीतीं लाभावी हीही एक आकांक्षा असते. स्वामी विवेकानंदांनी एके ठिकाणी म्हटले आहे की, माणसाने कीतींची आकांक्षा धरावी. पण कीर्ती काही वाटेवर पडलेली नाही. ती मिळवण्यासाठी फार मोठे मोल द्यायवे लागते. आळस सोडून अभ्यास करावा लागतो. अंग मोडून काम करावे लागते. इतर क्षुद्र सुखांचा आणि मोहांचा त्याग करावा लागतो. लोककल्याणासाठी चंदनाप्रमाणे झिजावे लागते आणि उदबत्तीप्रमाणे जळावे लागते. तेव्हाच या मर्त्य जीवाला अमर कीर्तीचा लाभ होत असतो पुढील गोष्टीतल्या हरदौलाला सत्कीर्तीवाचून आणखी कशाचीच अपेक्षा नव्हती. सगळ्या प्रजेच्या मनी, सुखी आपण राहावे आणि सर्वांनी आपल्यापुढे आदराने आपले मस्तक ठेंगणे करावे म्हणून तो अहर्निश झटत होता. ज्या ज्या महापुरुषांनी आपल्या धवल कीर्तीचा ध्वज फडकावला, त्यांनी या ना त्या प्रकारे पराच्या कारणे देह कष्टावला, असेच तुम्हाला आढळून येईल. मोठ्या ध्येयासाठी निःस्वार्थपणे स्वतःला वाहून धेणे हीच सत्कीर्ती मिळवण्याची गुरुकिल्ली आहे.
लेखक: महादेवशास्त्री जोशी
संदर्भ क्रमांक: १०३६
