निसर्गचित्रे
सारांश: आपण शहरात राहत असू किंवा उपनगरात अथवा ग्रामीण भागात, आपल्या घराला एक भवताल असतो. निदान दोन-चार वेगवेगळी झाडं असतात, पाखरं असतात, डांबरी रस्त्यांखेरीजची जमीन असते, डोक्यावर आभाळ असतं, ऊन- वारा-पाऊस असतो आणि ऋतूनुसार बदलणारी गार-गरम-सर्द हवाही असतेच असते. प्रत्येक महिन्यात हा भवताल बदलत असतो, त्याचे रंग बदलत असतात. बारा महिन्यांची ही बारा चित्रं आहेत. दर महिन्यातला बदलता निसर्गच खरं तर त्या त्या महिन्याची ओळख सांगत असतो, त्याची ओळख सांगणारा चेहरा त्याला देत असतो. या चेहऱ्याकडे आतल्या डोळ्यांनी पाहिलं तर आणखीही काही जाणवतं, नव्यानं कळतं आणि संस्कृतीच्या काही अंधाऱ्या वाटा उजळत असल्याचा भास होतो. निसर्गाकडे निसर्गाचा एक भाग होऊन पाहणारी दृष्टी महत्त्वाची. ही दृष्टीच हे लहानसं पुस्तक देईल, असं वाटतं.
लेखक: वर्षा गजेंद्रगडकर
संदर्भ क्रमांक: ४०४४
