चारशे सार्थ संस्कृत सुभाषिते


सारांश: श्लोकमय सुभाषिते हे खास संस्कृत भाषेचे वैशिष्ट्य आहे. अशा प्रकारची सुभाषिते संस्कृतशिवाय कोणत्याही भाषेत नाहीत. म्हणूनच जगभरचे विद्वान या सुभाषितांनी मोहून गेले. 'लुडविक बाख' सारखा जर्मन प्राध्यापक केवळ सुभाषिते गोळा करण्यासाठी भारतात येऊन राहिला व त्याने देहही भारताच्या भूमीवरच ठेवला. सुभाषितामध्ये दोनचार हजार वर्षातील शहाणपण आणि अनुभव एकत्रित झालेले आहे. फक्त हे शहाणपण आणि हे ज्ञान लुटून नेणाऱ्यांचीच उणीव आहे. या सुभाषितरत्नभांडाराची दारे उघडी आहेत. आपल्या पिढीला हा केवढा मोठा ठेवा लाभलेला आहे! या सर्व पुस्तकातून तीनएक हजार निवडक सुभाषिते दिली आहेत. तुमच्या सामर्थ्याप्रमाणे तुम्ही हवी तेवढी आत्मसात करा. आणि मग पहा काय चमत्कार होतो ते! सुभाषिते हा काही केवळ अभ्यास करण्याचा विषय नाही. त्यातील शहाणपणाचा उपयोग जीवनात करुन तुमचे जीवन अर्थपूर्ण बनवण्याचे सामर्थ्य या सुभाषितात आहे. या सुभाषितांची किंमत किती आहे? हे सांगताच येत नाही. एका राजाने लाखो रुपये देऊन सुभाषिताची एक ओळ विकत घेतली होती; पण ती ओळ वेळेवर आठवल्यामुळे; 'राजा गैरसमजाने राणी व राजपुत्राला ठार मारणार होता, त्यांचे प्राण वाचले' अशी कथा आहे. 'सहसा विदधत् न क्रियाम् अविवेकः परमापदाम् पदम्।' हीच ती ओळ. सुभाषितासंबंधी अशा अनेक कथा संस्कृत साहित्यात आहेत. सुभाषितांसंबंधी एक सुभाषित आहे, ते सांगते की या पृथ्वीवर अन्न, पाणी आणि सुभाषिते या तीन गोष्टीच अमोल रत्नासारख्या आहेत, पण मूर्ख लोक दगडाच्या तुकड्यालाच रत्ने म्हणतात, याला काय म्हणावे?

लेखक: ह. अ. भावे, मिलिंद दंडवते 

संदर्भ क्रमांक: १००८

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र