दुर्गसंपदा महाराष्ट्राची
सारांश: 'गडकोट' व 'दुर्गवैभव कोल्हापूर जिल्ह्याचे या पुस्तकांच्या अपूर्व यशानंतर आम्ही मनस्वी भटक्यांसाठी आमचे तिसरे दुर्गविषयक पुस्तक घेऊन येत आहोत- 'दुर्गसंपदा महाराष्ट्राची' या पुस्तकात सह्याद्रीच्या गिरीशृंखलांवर आडबाजूला उभ्या असलेल्या चाळीस दुर्लक्षित गडकिल्ल्यांचा धांडोळा घेतला गेला आहे. ही अभ्यासपूर्ण शोधक गडभ्रमंती केली आहे, तरुण दुर्गअभ्यासक श्री. भगवान चिले यांनी. 'दुर्गसंपदा महाराष्ट्राची' हे पुस्तक वाचून अनुभवून आपण ही शिवरायांच्या स्वराज्य निर्मितीच्या भगीरथ प्रयत्नांचे मूक साक्षीदार असणाऱ्या गडकिल्ल्यांना बोलते करण्याच्या या प्रवाहात स्वतःला झोकून द्यावे, म्हणूनच या दुर्गविषयक पुस्तकांच्या लिखाणाचा पुनःपुन्हा प्रपंच!
लेखक: भगवान चिले
संदर्भ क्रमांक: २०३२
