सुलभ योगासने किंवा योग्यांची व्यायामपद्धती
सारांश: आपण आपल्या पुराणकथांत वाचतो की, अमका योगी १४०० वर्षे जगला, तमका योगी ५०० वर्षे जगला याचा अर्थ इतकाच की, हे सर्व योगी दीर्घायुषी होते. योगी जे व्यायाम करीत त्यांना योगासने म्हणतात. मराठीतील प्रसिद्ध पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, ९० व्या वर्षी त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, "सध्याही मी दररोज ३६ प्रकारची योगासने करतो," म्हणजेच- 'योगासने हा व्यायाम ६ वर्षांच्या बालकापासून ते थेट ९० वर्षांच्या तरुणांपर्यंत करण्यासारखा आहे व उपयुक्त आहे. योगासने हाच मानवी देहाला अतिशय योग्य व्यायाम आहे.
लेखक: गो. म. चिपळूणकर
संदर्भ क्रमांक: ५००८
