कल्पवृक्ष
सारांश: इ.स.पूर्व तिसऱ्या शतकात अशोकाचा जन्म झाला. त्याने ४० वर्षे साम्राज्य चालविले. उत्तरेस हिंदुकुश पर्वतापासून दक्षिणेत म्हैसूरपर्यंत त्याचे साम्राज्य पसरले होते. अशोकाचे साम्राज्य हेच इतिहासातील पाहिले भारतीय साम्राज्य. तो प्रथम हिंदुधर्मीय पण पुढे भगवान् बुद्धाचा उपासक बनला. आपल्या प्रजेला त्याने पुत्रवत् मानले आणि मायेने पाळले. ऐतिहासिक काळातल्या जगद्विख्यात महापुरुषांत अशोकाला अग्रमान आहे. सम्राट पदावर असूनही त्याने भोगाकडे पाठ फिरवून आपले चित्त, वित्त व जीवित धर्मकार्यासाठी आणि प्रजेच्या उत्कर्षासाठी वेचले. 'राजभिक्षु' म्हणून तो इतिहासात अजरामर झाला. त्याच्या जीवनसमाप्तीच्या वेळचा एक उदार प्रसंग पुढील गोष्टीत वर्णिला आहे.
लेखक: महादेवशास्त्री जोशी
संदर्भ क्रमांक: १०३८
