श्रीसमर्थ रामदास स्वामींच्या जीवनचरित्रातील १११ गोष्टी
सारांश: श्रीसमर्थ रामदासस्वामींचे चरित्र आजच्या तरुणांसाठी प्रेरक आहे. रमाकांत देशपांडे यांनी त्यांच्या चरित्राचे महत्व ओळखून या पुस्तकात त्यांच्या आयुष्यातील प्रेरक ठरतील असे प्रसंग सांगितले आहेत. या पुस्तकात रामदासस्वामींच्या घराण्याची माहिती; तसेच वंशावळही दिली आहे. प्रत्यक्ष सूर्यनारायणाच्या कृपेने रामदासस्वामींचा जन्म झाला. स्वामींच्या बालपणीच्या कथेनंतर लग्नमंडपातून पलायन करणाऱ्या नारायणाची कथा सांगितली आहे. माधुकरी मागून भोजन, ध्यानधारणा, ग्रंथवाचन, उपासना असा त्यांचा दिनक्रम होता. त्यांनी केलेला चमत्कार, त्यानंतर शहाजीराजांची भेट, समर्थांचे भारतभ्रमण, काशीक्षेत्री चमत्कार, गृहेत वाघांचे सान्निध्य असे एकापाठोपाठ एक प्रसंग वाचायला मिळतात. समर्थांचे शिष्यगण, शिवाजीमहाराजांना अनुग्रह, संतांची भेट असे इतर प्रसंगही पुस्तकात रंगविले आहेत. कल्याणस्वामींच्या कथांचाही पुस्तकात समावेश आहे.
लेखक: प्रा रमाकांत देशपांडे
संदर्भ क्रमांक: १०३५
