गणेशस्तुती


सारांश: कोणत्याही मंगल कार्याला आरंभ करताना मंगलमूर्ती श्रीगजाननाचे मंगलमय स्मरण करणे ही सज्जनांची परंपरागत पध्दती आहे. कारण तो विघ्नहर्ता आहे. तो विघ्नराजही आहे. तो आपल्या सामर्थ्याने विघ्नांना प्रेरणाही देऊ शकतो व विघ्नांचे दमन आणि शमनही करू शकतो. ब्रह्मदेवानेही विश्वरचनेच्या आरंभी श्रीगजाननाचे ध्यान केलेले होते. शंकराने त्रिपुरासुराचा व पार्वतीने महिषासुराचा वध करताना गणपतीचे ध्यान केलेलेच होते. केवळ आरंभिलेले कार्य निर्विघ्नपणे सिद्धीस जावे याच हेतूने गणपतीचे ध्यान करायाचे नसून भुक्ती आणि मुक्तीही गणेशापासून आपल्याला मिळवावयाची असते. कारण तो भुक्तिमुक्तीचा नायक आहे. तो शारदेचाही अधिपती असल्यामुळे आपली बुध्दी विद्येच्या क्षेत्रात विशारद होण्यासाठी आपण त्याचे ध्यान करणे आवश्यक आहे.

लेखक: शंकर अभ्यंकर

संदर्भ क्रमांक: १००१

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र