स्वातंत्र्यवीर सावरकर


सारांश: स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म २८ मे १८८३ या दिवशी नाशिक जिल्ह्यात भगूर येथे झाला. विनायकाचे वडील दामोदरपंत हे विद्वान होते. ते कविताही करीत असत. विनायकाच्या मातोश्री राधाबाई ह्या धर्मनिष्ठ व दयाळू होत्या. विनायकाचे मोठे बंधू गणेशपंत. विनायकाचा धाकटा भाऊ नारायण. त्यांना एक बहीणही होती. सावरकरांचे घराणे प्रसिद्ध होते. मराठेशाहीत पराक्रम गाजविल्यामुळे दामोदरपंतांच्या पूर्वजांना लहानशी जहागीर मिळालेली होती. छोटे कुटुंब सुखासमाधानाने कालक्रमणा करीत होते. दामोदरपंत छोट्या विनायकाला रामायण-महाभारतातल्या व महाराणा प्रताप, श्रीशिवाजी महाराजांच्या कथा सांगत. विनायकाने काव्याची दीक्षा वडिलांकडूनच घेतली. विनायकाचा चुणचुणीतपणा, त्याचे देखणे रूप पाहून सर्वांना संतोष होई...

लेखक: श्री. के. देवधर 

संदर्भ क्रमांक: २०१९

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र