मनाचे श्लोक - सार्थ


सारांश: समर्थ रामदासकृत ‘मनाचे श्लोक' म्हणजे महाराष्ट्र सारस्वताचा श्रेष्ठ अलंकार आहे. जनसामान्यात आणि विद्वान पंडितातही 'मनाचे श्लोक' अत्यंत लोकप्रिय आहेत. मनाच्या श्लोकांना स्वतः समर्थ रामदासांनी 'मनाची शते' म्हणून संबोधिले आहे. मनाच्या श्लोकांचे नित्य पठण केले आणि त्यातील शिकवण आपल्या चित्तात हळुहळू मुरवली, तर 'मी देहाचा नसून श्रीरामांचा, भगवंतांचा आहे', असे प्रत्ययास येईल. समर्थांनी शेवटच्या श्लोकात सांगितलेली फलश्रुती ‘चढे ज्ञान वैराग्य सामर्थ्ये आंगीं।' हा प्रत्यक्ष अनुभव येईल. पण त्यासाठी अखण्ड अभ्यास, सदाचार, चिकाटी, श्रद्धा यांना मात्र आपल्या चित्तात व बुद्धीत धारण केले पाहिजे. समर्थांनी सांगितलेला ‘सर्वोत्तमाचा दास’ आत्मज्ञानी आहे. त्या वाटेवरून चालण्याची प्रेरणा अवघ्यांना श्रीरामांच्या कृपेने लाभो हीच प्रार्थना. 'मनाचे श्लोक' लिहून समर्थ रामदासांनी समस्त प्राणीमात्रांवर अनंत उपकार केले आहेत.

लेखक: अपर्णा अभ्यंकर 

संदर्भ क्रमांक: १०१५ 

लोकप्रिय पुस्तके

बचत गट

श्री शिवलीलामृत

चिंच, शेवगा व कडीपत्ता लागवड

रान भाज्या

नित्यपाठाचे अभंग

श्री शिवलीलामृत अकरावा अध्याय

अर्थसखी

काटकसर व बचत

निळावंती

ठिबक सिंचन तंत्र